सरसर
सरसर सरून गेले
काळाचे
क्षण विरून गेले
पुष्कळसे
मन विसरून गेले
कित्येक हातून
निसटून गेले
अशांतीचे
सूर लावून गेले
तर काही अतृप्त
ठेवून गेले
मैत्री
नाती न उरली आता
कुणी
दुखविले जाता जाता
कुणी
दुखावले न कळता
काही
नाती न आली जोडता
एकांताचे
कायम शल्य
आता
स्मृतीत झुरणे
उरले आता
मनी
अंतरी उर्मी जागत नाही
आशा
आकांक्षा उरल्या नाही
गरज
कशाची भासत नाही
कौतुकाचे
आता अप्रूप नाही
यशाचे
काहीच वाटत नाही
नैराश्याचे
द्वंद्व सुटत नाही
-
अभिजीत कुंभार
No comments:
Post a Comment