Sunday, June 14, 2020

सुशांत सिंग राजपूत



एक देखणे रूप... सगळ्यांना हवे हवे से वाटणारे. त्यावर मोहिनी घालणारे स्मितहास्य. त्याचा चैतन्यपूर्ण वावर. एखादे परिपूर्ण व्यक्तिमत्व कसे असावे या प्रश्नाचे उत्तर जणू त्याच्यामध्ये लोकांना सापडले असावे.  सामान्यांच्या आकांक्षांचे मूर्तिमंत रूपच. पण अशाच व्यक्तिमत्वाच्या अचानक जाणे हे सगळ्यांना चटका तर लावून गेलेच पण त्याच वेळी अनेक अनुत्तरित प्रश्न जागे करून गेले.
का ?  असे कसे शक्य आहे? तू सुद्धा ? असे किती तरी  आपुलकीतुन निर्माण झालेले  प्रश्न चाहत्यांच्या मनामध्ये घोळत असतील आणि काही दिवस ते घोळत राहतील.
 खरं सांगायचं झाले तर आपल्याला खरी उत्तरे कधीच सापडणार नाहीत. सर्व जण शक्यता वर्तवतील आणि काही जण आपलीच शक्यता खरी कशी आहे हे आपापल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करतील. पण जसा या बातमीवर विश्वास बसत नाही तसाच त्या शक्यतांवर विश्वास बसेल असे  नाही. एखाद्याच्या जीवनात काय घडत असेल, त्याच्या मनाला कोणत्या चिंतांनी ग्रासले असेल हे ती व्यक्ती सोडून कुणीही खरे उत्तर देऊ शकणार नाही. आणि ज्या क्षेत्रामध्ये परिपूर्णतेचा मुखवटा हीच अस्तित्वाची गरज असते त्या क्षेत्रामध्ये तर हे सत्य मुखवट्याच्या मागे कायमचे कोंडले  गेलेले असते. आणि मनातली  खदखद, घुसमट मोकळी करण्याचा कदाचित एकच मार्ग उरत असेल. आता तर एक मुखवटा कायमचा  निःशब्द झाला आहे.   त्याच्या चाहत्यांना आता एक नवा चेहरा शोधावा लागेल स्वतःच्या आकांक्षा ज्याच्यामध्ये पाहता येतील असा.  
                 अभिजित कुंभार

1 comment:

  1. मला असे वाटते की देवानी देलीले हे जीवन आपण असे गमावू नये. कितीही त्रास असला तरी मदत घ्यावी. बोलणे फार सोपे आहे......ज्याचा त्रास त्याला माहित. But we should not foget that our life is precious.

    ReplyDelete