Saturday, May 30, 2020

मित्र


­­                                                 
जीवन हा एक प्रवास असतो. अगदी रुक्षपणे बोलायचे झाले तर बाल्यावस्थेपासून ते वृद्धावस्तेपर्यंतचा अंतिमतः मृत्यूमध्ये संपणारा तो प्रवास असतो. पण तरीही मार्गक्रमण करत असताना मृत्यू हे आपले अंतिम ध्येय कधीच नसते. किंबहुना तो आपल्या ध्यानी मनी देखील नसतो. आपली ध्येये हि भौतिक असतात. जसे कि मला श्रीमंत व्हायचे आहे, गाडी बंगला हवा आहे, किंवा मला लोकांची सेवा करायची आहे वगैरे वगैरे. आणि जीवनभर आपण हि उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या मागे असतो. ते कसे साध्य  कसे करता येईल    येईल याचा प्रयास आपले जीवन आणि मन पूर्ण वेळ व्यापून टाकत असतो. हे सगळे करत असताना आपल्या अंतर्मनामध्ये काही प्रश्न, काही शंका, काही द्वंद्व, काही अपेक्षांची पूर्तता झाल्याचे नैराश्य अविरतपणे वावरत असतात. त्यांची उत्तरे, त्यांचे समाधान आपण मिळवण्याचा प्रयत्न आपण करत जातो. त्या उत्तरांमधून आणि जीवनातल्या प्रसंगातून येणाऱ्या अनुभवांमधून आपले व्यक्तिमत्व घडत जाते, उजळत जाते.
कित्येकदा मनातला हा अंतर्गत झगडा अस्वस्थ करत असतो. तो बाह्य जगाला दिसत नाही. पण त्यामुळे  येणारा  अपुरेपणा मनामध्ये वास करत असतो. अशा वेळी आपण भौतिक गोष्टींपेक्षा मानसिक आणि अध्यात्मिक गोष्टींचा शोध घेऊ लागतो. पण कधी कधी काही व्यक्तिमत्वे आपल्या जीवनात येतात ज्यांच्या संवादाने हे झगडे शमून जातात. आपल्या मध्ये खोलवर दडलेल्या आपल्याच प्रतिभेचे दर्शन घडवतात आणि आपली खरी ओळख शोधण्यात मदत करतात.  मग आपला नवा प्रवास सुरु होतो.  तो रुक्षपणाचा नसतो, अथवा फक्त भौतिक गोष्टींसाठीचा नसतो. तर हा प्रवास अधिक श्रीमंत करणारा असतो. जीवनाच्या एका टप्प्यावर प्रत्येक जण अशा मित्राच्या अथवा मैत्रिणीची अपेक्षा करू लागतो. अशी अपेक्षा पूर्ण होतेच असे नाही. असा संवाद साधण्यासाठीचा मानसिक समतोलपणा असणारी आणि स्वतःबद्दल विचित्र संकल्पना ना बाळगणारी व्यक्तिमत्वे क्वचितच असतात. आणि असे व्यक्तिमत्व आपल्या जीवनात आले असेल तर त्याबद्दल मन नेहमीच कृतार्थ असते. 
                                                                                                              अभिजित कुंभार


माती


एखाद्या ठिकाणाची भौगोलिक परिस्थिती आणि तिथली माती हि तिथले जीवनमान ठरवत असते.  प्रत्येक ठिकाणच्या मातीचा पोत वेगळा, तिचा रंग वेगळा, तिथली पोषकतत्वे वेगळी. माती मधल्या घटक तत्वावरून ठरते कि तिथे काय उगवू शकते आणि भौगोलिक परिस्थितीवर ठरते कि तिथे काय टिकेल, काय बहरेल. कुठली पिके जोमाने उगवणार, कुठल्या फळांची झाडे बहरणार, कुठली फुले उमलणार हे सगळी त्या मातीवर ठरत असते. मग एका ठिकाणचे आंबे गोड़ लागतात, तर एका ठिकाणची वांगी चविष्ट लागतात, कुठे अवोकाडो उगवतो तर कुठे चहा कॉफीचे मळे उगवू शकतो , आणि कुठे द्राक्षांचे मळे  पसरतात.  या गोष्टींचा साहजिकपणे तिथल्या जीवनमानावर प्रभाव पडताना दिसून येतो. तिथली जीवनपद्धती, वर्षाचे चक्र, तिथले सण हे सगळे ठरत जातात. प्रत्येक ठिकाणच्या घरांचे रंग, घरांची रचना, तिथली खाद्यसंस्कृती, तिथले खेळ  यांच्या रूपात  त्या  ठिकाणाची वैशिष्ट्ये जपत संस्कृती फुललेली आपल्याला दिसून येते.  एका प्रकारे त्या संस्कृतीमधून माती आपली अभिव्यक्ती जपत असते.
माती ने अशा कित्येक संस्कृती  पोसल्या, फुलवल्या आणि वेळ प्रसंगी स्वतःच्या पोटात दडवल्या सुद्धा.  मग कधी जमिनीत दडलेल्या संस्कृतीच्या खुणा बाहेर पडतात. कुठे जुन्या काळातल्या प्राण्याचे सांगाडे वर येतात, कुठे जीवाश्म सापडते, कुठे देवाची मूर्ती मिळते, तर कुठे भांडी कुंडी मिळतात, कुठे नाणी मिळतात. कधी मंदिरे मिळतात  तर कधी मोठाली शहरे...  
या सगळ्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आधीच्या संस्कृत्या या निसर्गाशी जोडल्या गेल्या होत्या, मातीच्या जवळ होत्या. जीवनपद्धती मुख्यत्वे शेतीवर आधारलेली होती.  आता काय दिसते?  लहानपणी घरासमोर जी रिकामी जागा होती ज्या मध्ये आम्ही मैदानी खेळ खेळलो तिथे आता  बंगले उभे राहिले आहेत. दोन गावांमध्ये असलेल्या शेत जमिनी विकल्या जाऊन तिथे घरांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. सर्वत्र जंगल तोड झाली आहे, डोंगर कापले गेले आहेत, खनिज उत्पत्तीसाठी जमीन पोखरली गेली आहे. मैदानी खेळांची जागा आता इनडोअर स्टेडियम्स मध्ये होणारे खेळ अथवा कॉम्पुटर गेम्स नि घेतली आहे.  शेतकरी शिकून शेत विकत आहे आणि मोठ्या कंपन्या शेती करत आहेत. थोडक्यात काय तर माणूस हळू हळू मातीपासून दुरावला आहे. कदाचित येणाऱ्या काळामध्ये घरातली येणारी अनावश्यक धूळ इतकाच काय तो माती शी संपर्क राहील कि काय असे वाटते. आपण जशी धूळ झटकतो तसेच माती ने आपल्याला झटकले तर?
एखादा प्रलय आल्यावर जीवसृष्टी नष्ट होणे आणि काही काळाने एक नवी जीवसृष्टी उपजणे हा सृष्टीचा नियम आहे. कारण माती जिवंत असते. मागच्या जीवसृष्टीचा अंश मातीमध्ये मिसळलेला असतो. ते जीव तत्व पोषक वातावरण झाल्यावर पुन्हा वाढ घेऊ लागते. समजा असा एखादा प्रलय आला. तो येणार नाही असे समजू नये. एखादा व्हायरस जर हाहाकार माजवू शकतो तर प्रलय येणे अगदी अशक्य नाही. आणि जर असा प्रलय आला तर माती मध्ये काय मिसळले जाईल? मोठं मोठाले दुर्गंधीयुक्त  डम्पिंग यार्डस, प्लास्टिक च्या वस्तू, इलेक्ट्रिक कार्स च्या batteries ,  रासायनिक waste, सिमेंट काँक्रेटची घरे, डांबराचे रस्ते. हे सर्व माती मध्ये मिसळून नवी सृष्टी उभी राहील? मनुष्यासाठी मातीचा जिवंतपणा जाऊन फक्त धूळ रूपात च शिल्लक राहत असेल तर माती ला अथवा जमिनी ला आताच्या प्राण्यांचे मुख्यत्वाने मनुष्याचे काय महत्व वाटत असेल? माती देखील दुरावली असेलच ना?                                                                                                                                 
                                                                           अभिजीत कुंभार

पाचोळा




झाडाला संवेदना असतात ना? मग तशाच संवेदना पानांना देखील असतील ... मग गळून गेलेल्या पानांना हि असू शकतील....   सहसा आपण पाचोळ्यामधे साचलेल्या पानांच्या बाबतीत तितके संवेदनशील कधीच नसतो .... पण समजा त्यांना देखील स्वतःचे विचारविश्व असेल तर ते कसे असेल?
झाडापासून पहिल्यांदा निखळून हवे मध्ये अलगद तरंगताना येणारा पहिला विचार काय बरे असेल? इतके दिवस असलेले झाडावरचे परावलंबन संपून  झाडावर बसायला येणाऱ्या पक्षांप्रमाणेच जणू आपण उडत आहोत कि काय असे वाटत असणार.... हवेतून जमिनीवर टेकल्यावर मात्र स्वातंत्र्याच्या भ्रमाचा भोपळा फुटत असेल. हवेत उड्डाण घेण्यासाठी आपण किती असमर्थ हे लगेच लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे लक्षात आल्यावर नैराश्याची भावना नक्कीच येत असेल. मग मात्र झाडापासून का दुरावलो, झाडाने कसे एका क्षणात परके केले यामागचे क्रौर्य हळू हळू उमगत  असेल.
ज्या झाडाच्या अंगावर आपण पावसात न्हालो, वादळ वाऱ्यांना तोंड देऊन उभे राहिलो, कधी साथ सोडली नाही. त्याच झाडावरती होणार पक्षांचा चिवचिवाट जवळून ऐकला, मोहोर अनुभवला, क्षितिजावर होणारे सूर्योदय आणि सूर्यास्ताचे खेळ पाहिले. आपल्या हरित्कणांमुळे झाडाचे पोषण झाले. पण एकदाचे ते हरितकण काहीसे विरळ काय झाले तर लगेच झाडाने आपली साथ सोडावी याचा विषाद कायमचा मनात राजाच्या असेल. अशात देखील आपल्या शिवाय झाडे कसे रूक्ष आणि भेसूर दिसते हे पाहून तू माझी किंमत नाही केली म्हणून असे झाले अशी सूडबुद्धी जागी होत  असताना पुन्हा एकदा मला स्वीकारशील का अशी केविलवाणी अपेक्षा देखील येत असेल
वसंतामध्ये नवी पालवी आल्यावर मात्र आपल्या आशा अपेक्षा किती भाबड्या होत्या हे उमगत असावे. नव्या पानांनी झाड पुन्हा बाहेरून आले तर मात्र आपले परतीचे दरवाजे हे कायमचे बंद झाले असून आता मात्र या सृष्टीतून मोक्ष घेतलेला बरा हा साक्षात्कार घडत असणार. तो पर्यंत कुण्या प्राण्याच्या पायदळी तुडवले जाणे, वाऱ्यामध्ये फरफटत जाणे, पावसाच्या पाण्यात वाहवत जाणे, अळ्यांचे कुरतडणे हे सगळे मुकाट्याने आणि कोणतीही तक्रार करता अनुभवत हळू हळू या मातीशी मिसळून जाणे हा प्रवास ते पान  करत असणार
  माणसांमध्ये देखील स्वतःच्या आधारापासून दुरावलेली मन वृद्धाश्रमात राहत असतात. स्वतःच्या मोक्षाची वाट पाहत. तो मानवी पाचोळा म्हणता येईल
काळाच्या बघत शहरांमध्ये मोडकळीला आलेल्या वास्तू  देखील अशाच. तो शहरीकरणाचा पाचोळा म्हणता येईल
आपल्या मनाच्या अडगळीत विस्मृतीत गेलेल्या आठवणींना आपण स्मृतीचा पाचोळा म्हणू शकू
शेवटी पाचोळ्याचे काय आहे.. तो साफ करावाच लागतो.. कारण एकदा का नवी पालवी फुटली कि तिचा प्रवास सुरु होता पाचोळा बनण्याच्या मार्गावर
अभिजित कुंभार

उत्तर


                                                            उत्तर
शुक्रवारचे दुपारचे चार वाजले होते. यश नेहमीप्रमाणे आपल्या कामात दंग  होता. एक स्प्रिंट नुकतीच live  गेली होती.  पुढच्या स्प्रिंट चे प्लांनिंग करायचे होते. सगळ्या  business टीम्स नि दिलेल्या requirements  पैकी कोणत्या पुढच्या स्प्रिंट मध्ये बसवता येतील, सगळ्यांना एकाच वेळी खुश करता येत जरी नसले तरी ही  कुणी नाराज होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे होते. गेल्या दोन वर्षांमध्ये महत्वाचे प्रोजेक्ट्स लीलया सांभाळलेले असल्याने एक विश्वासार्हता निर्माण झाली होती ती जपणे अतिशय आवश्यक असते. कारण या कॉर्पोरेट जगतामध्ये तुम्ही किती  कौशल्याने गोष्टी हाताळल्या हे तितके नजरेत  भरत नाही पण एखादी साधी चूक मात्र लोकांच्या रोषाचे कारण बनू शकते. आणि दर दोन आठवडयांनी येणाऱ्या स्प्रिंट्स मुळे  तारेवरची कसरत हि कायमची च होती. ती कसरत सांभाळत दोन वर्षे कशी गेली हे लक्षातच आले नव्हते. पण सगळे प्रोजेक्ट्स किती कौशल्याने हाताळले याचा एक अभिमान होताच आणि आता आपले प्रोमोशन नक्की आहे अशी खात्री होती. तसे कित्येक colleagues  बोलूनच दाखवत होते कि तुझे प्रोमोशन नक्की आहे. 
तेवढ्यात बॉस डेस्क जवळ येऊन म्हणाला ' यश तुझ्याशी थोडे बोलायचे आहे' 
बॉस ने असे बोलावणे हे काही नवीन नव्हते. कुठलं महत्वाचा प्रोजेक्ट गळ्यात टाकायचा असेल, त्याच्या लाडक्या टीम मेंबर ला मदत करायची असेल, काही  सल्ले  द्यायचे असतील, काही प्रोजेक्ट अपडेट्स घ्यायचे असतील तर असे बोलावणे यायचे. पण या वेळी मनामध्ये घोळत असणाऱ्या प्रोमोशन ची शक्यता जास्त वाटली. त्या  मुळे  यश  ताडकन उठून, कॉम्पुटर लॉक करून बॉस च्या मागे मागे निघाला. वाटेत भेटणारे colleagues  प्रश्नार्थक नजरेने पाहत होते. काही होतेच काहीसे चौकस, काहीसे फाजील उत्सुकता असणारे. पण त्या सगळ्यांना सांभाळून त्यांना खुश ठेवून काम केले होते आणि त्यामुळे कुणी हि विरोध करणारे नव्हते. त्या सर्वांच्या नजरेला नजर देत सगळ्यांना smile देत बॉस च्या मागे मागे यश  मीटिंग रूम पर्यंत पोहोचला. बॉस ने दार उघडले आणि यश  ला आधी जाऊ दिले., त्याला खुर्ची वर बसायला सांगितले आणि स्वतः  टेबल च्या दुसर्या बाजूला जाऊन बसला. टेबलावर रेलून तू बोलू लागला
'  you have been outstanding for Last two years. दोन वर्षांपूर्वी तू जेव्हा जॉईन केलेस तेव्हां कंपनी झपाट्याने वाढत होती. तू अत्यंत कमी  वेळेत स्वतःचा जम बसवलास आणि महत्वाचे प्रोजेक्ट्स डिलिव्हर केलेस. कंपनी बरोबर तुझी सुद्धा growth झालेली मी पाहिली आहे
बॉस चे हे बोलणे ऐकून यशला छान वाटत होते. यामध्ये अनपेक्षित असे काहीच नव्हते. उलट दोन वर्षे संपल्यावर असे संभाषण होणे हे स्वाभाविक आहे असे त्याला वाटत होते. कारण त्याला चांगल्या कामाची जोड  होती. पॅट्रिक एक महिन्यापूर्वीच कंपनी सोडून गेला होता आणि त्याच्या नंतर टीम मध्ये सिनिऑरिटी नुसार  आणि क्षमतेनुसार यश चा नंबर लागणार हे नक्की होते. आणि प्रोमोशन साठी अशा गोष्टी जुळून आलेल्या असताना हे संभाषण होणार हे नक्की होते. आता फक्त बॉस पुढे काय बोलतो आणि बातमी कशी देतो याची उत्सुकता दाटत  होती
When you look back you will realize the opportunities company has offered you’
यश विचारात पडला हे मॅनेजर लोक साधी सरळ गोष्ट सुदधा किती ताणवून ठेवतात. सरळ मुद्द्याला हात का नाही घालत. उगाच  आढे वेढे घेत , विषयाला वळणे देत बसायचे. अरे मोजके माफक शब्द वापरून  किती productivity वाढवतील हे कसे लक्षात येत नाही यांच्या?
company has benefitted from you a lot. आणि सगळे जण हे ओळखतात. You will carry this experience with you in future. I am sure you will do great in whatever position you will be in’
विषयाला घातलेले हे वळण यश ला काहीसे अस्वस्थ करू लागले. बॉस मुद्द्याचे का बोलत नाही आहे हा प्रश्न त्याला पडू लागला
तुझ्या प्रोजेक्ट्स नि कंपनी ला पुष्कळ फायदा झाला आहे किंतु ....’
संभाषणामध्ये किंतु चे मांजर आडवे आल्याने यश च्या मनात शंकेची पाल चुकचुकली. या पुढचे होणारे संभाषण फारसे आशादायी नाही हे त्याला समजून चुकले. स्वतःला सावरून तो मनाला तयार करून बॉस चे बोलणे ऐकू लागला

'आपल्या कंपनी ची मार्केट position गेल्या quarter मध्ये थोडी weak झाली आहे
आता प्रोमोशन यंदा मिळणार नाही आणि आणखी थोडे वाट पाहावे लागणार याचा यश ला अंदाज आला. करिअर मध्ये आज वर दोन वेळा recession अनुभवली असल्याने अशा ऐन वेळी बसणाऱ्या धक्क्यांची त्याला सवय होती. ऐन वेळी तोंडापर्यंत आलेला घास मागे घेऊन तोंडाला पाने पुसली जाणार म्हणून मन खटटू झाले. पण आपण सहजपणे हे मान्य करणार आहोत असे बॉसला वाटू नये म्हणून काय बोलावे हे तो मनाशी ठरवू लागला
बॉस:  ' आपल्याला टीम मधून १०% कट घ्यायचा आहे. मी फार प्रयत्न केला management ला सांगायचा कि आपली टीम कशी महत्वाची आहे. पण काही उपयोग झाला नाही. It is hard decision for me. But I had to do what is in the best interest of all’
यश ची चिंता हळू हळू वाढत होती. पण स्वतः केलेले काम आणि business आणि stakeholders चे चेहरे, त्यांचे कॉम्प्लिमेंट्स  आठवून तो मनाची समजूत घालत होता कि ज्याची भीती वाटत आहे तसे काही घडणार नाही
बॉस:  आम्हाला ज्यांची salary bracket वरची आहे त्या लोकांना काढायचा निर्णय घ्यावा लागला आहे. त्यामुळे इच्छा नसून देखील I have to let you go’
यश साठी हा मोठा धक्का होता. १० मिनिटांपूर्वी ऊंच भरारी घ्यायच्या तयारीत असणाऱ्यांचे पंखच कापून टाकल्यासारखे वाटले. काही वेळा पूर्वी अशक्यप्राय वावरणारी हि गोष्ट इतक्या सहजपणे घडू शकते यावर त्याचा विश्वास च बसत नव्हता. आपले काय चुकले असावे याचा मागोवा मन घेऊ लागले. कधी आपल्या कामाबद्दल कुणाची तक्रार आली नाही, उलट कौतुकच ऐकले. टीम मध्ये प्रत्येक quarter ला दिले जाणारे स्टार परफॉर्मरचे ४ वेळा अवॉर्ड मिळाले. कित्येकांचे माझ्याशिवाय पण देखील हलत नव्हते. त्यांना हे माहीत असेल का? ते लोक बॉस ला माझ्याबद्दल विचारातील तेव्हां बॉस चे उत्तर काय असेल?
तसा बॉस निर्लज्जच आहे म्हणा. हा काहीही कारण देईल. पण  बॉस ला स्वतंत्र विचारांची आणि महत्वाकांक्षी व्यक्ती नको होती. त्याने पद्धतशीर पाने आपला काटा काढला हे यश च्या लक्षात आले होते. आता मात्र आपल्याकडे किती वेळ आहे असा विचार तो करू लागला
बॉस: “ तुझ्याकडे ३० मिनिटे आहेत. HR will talk to you. Then you can hand over your badge and laptop”
यश ने मनाची तयारी केली होती. त्याला बॉस समोर आपण मनाने कमजोर अथवा लाचार आहोत असे दाखवायचे नव्हते. स्वतःची वेगळी ओळख प्रस्थापित करणाऱ्यांच्या बाबतीत तो असुरक्षित होता. आणि कदाचित पॅट्रिक ला देखील यानेच जायला प्रवृत्त केले असावे.  बॉस बद्दल काही लोकांना गॉसिप करताना यश ने ऐकले होते. पण त्याकडे नेहमी दुर्लक्षच केले होते. कारण कंपनीचे मिशन प्रोजेक्ट गोल या वरून दुर्लक्ष होईल असे त्याला वाटायचे. आणि ते होऊ नये म्हणून तो अशा संभाषणाला नेहमी फाटा द्यायचा
बॉस:  “ Thank you यश . It was great pleasure working with you. I tried but had no option. Tujhyasathi 1 महिन्याचे package दिले आहे. ते मिळवण्यासाठी मी मॅनेजमेंट शी भांडलो. तेवढेच मी तुझ्यासाठी करू शकलो. पुढच्या जॉब साठी reference हवा असेल तर सांग.  I will be happy to help you’
या मध्ये किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही हेच समाजत नव्हते. चांगुलपणाचा आव हा खरा कि खोटा ? हा निर्णय घ्यावा लागणे हि अपरिहार्यता कि कारस्थान ?  काहीच काळात नव्हते
दोघांनी हस्तांदोलन केले आणि बॉस ने दरवाजा उघडून यश ला रूम मधून बाहेर जाऊ दिले. डेस्क पर्यंत जाऊ पर्यंत hallway मध्ये काही colleagues भेटत होते. यश ने मनाशी निश्चय केला होता कि कुणापुढे आपण कमजोर दिसायचे नाही. सगळ्यांना सामील देत तो डेस्क पर्यंत आला. काही जणांना ती smile इतर वेळेपेक्षा थोडी मोठी वाटली असावी. कारण त्या मागे सगळे कसे ठीक आहे असे भासवायचा प्रयत्न होता
डेस्क वर येऊन त्याने स्वतःची बॅग हातात घेतली. तितक्यात HR Assistant त्याच्या जवळ आली. त्याला मीटिंग मध्ये रूम मध्ये घेऊन गेली. तिने काही फॉर्म्स भरायला दिले, काही प्रश्न विचारले. यश ने अतिशय यांत्रिकपणे ते सोपस्कार पार पाडले.  त्याच्या डोक्यामध्ये प्रश्नांचे काहूर माजले होते. ते घेऊनच त्याने ऑफिस सोडले आणि पार्किंग मध्ये कार शोधू लागला. वाटेत भेटणाऱ्या सर्वाना तो ती यांत्रिक सामील देत होता. पण आपल्या बॅग मध्ये काहीच नाही हे लोकांच्या लक्षात येत असावे हे समजल्यावर मात्र त्याचे smile कोमेजू लागले. आता त्याला कुणाशी नजरानजर करण्याची इच्छा राहिली नाही. कार मध्ये बसल्यावर त्याने झर्रकन गाडी पार्किंग मधून काढली. आता लवकरात लवकर त्याला घरी पोहोचायचे होते. कित्येक दिवस प्रोजेक्ट्स च्या टेन्शन मुले किंचित से डोके दुखत होते.आज बिअर घेऊ, उद्या घेऊ असे कित्येक दिवस तो टाळत  होता. कारण कामामुळे निवांत वेळ मिळताच नव्हता. आज तो निवांत वेळ मिळणार होता.एव्हाना ट्रॅफिक जॅम व्हायला सुरु झाले होते. आणि घरी पोहोचायला वेळ लागणार हे निश्चित होते. आज दिवसभरात मनासारखे काही घडतच नव्हते. नजर समोर होती, हाता मध्ये steering आणि पाय ब्रेक वर. मन मात्र भूतकाळाचा आढावा घेत होते
कुठे चुकले? काय घडले कि ज्याचा अंदाज आपण घेऊ शकलो नाही. बॉस ने दिलेली कारणे किती खरी किती खोटी? तो बोलत असताना तरी genuine  वाटत होता. पण त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. आपल्याबरोबर आणखी कोण गेले असेल?  कंपनी ला काही लोकांना काढायची गरज होती ते ठीक आहे. पण ज्यांचा काहीच फायदा असे नाही, जे टवाळक्या करत ऑफिस मध्ये हिंडत असतात, कॉफी रूम मध्ये तासंतास गप्पा मारतात, लंच नंतर तास तास भर ऑफिस भोवती walk घेतात. एकदा घरी गेले कि इमेल्स ना उत्तर देत नाहीत असे लोक  फक्त थोडा पगार कमी आहे म्हणून टिकू शकतात? कोणत्या आधारावर?  त्यांना बॉस ला खुश ठेवायचे, हांजी हांजी करायचे हे एकच criteria त्यांना टिकवून ठेवतो?
खऱ्या कामाचे काहीच कौतुक नाही? ज्या कंपनी साठी शनिवार, रविवार, Thanksgiving आणि Christmas च्या सुट्ट्यांमध्ये देखील काम केले, इतका ताण सहन केला त्याची काहीच कदर नाही? ऑफिस पॉलिटिक्स आणि गॉसिप मध्ये ना राहता कामावर लक्ष दिले हे या लोकांना दिसत नाही का? ऑफिस भर  HR Principles भिंतींवर टांगले गेले आहेत त्यांना काही अर्थ आहे का?
'Be honest, be humble, express your opinion, show grit ..... '
जेव्हां ऑफिस मध्ये interview  साठी आलो तेव्हां हे सगळे टांगलेले पाहून वाटले कि हि कंपनी वेगळी आहे. पण परिपूर्णतेचा हव्यास एकट्याने ठेवून चालतो? बॉस च जर एखादा घाशीराम कोतवाल निघाला तर करायचे काय? त्याच्या खाली तो स्वतःचेच राज्य चालवणार. ते ठीक आहे पण त्याच्या वरती असणाऱ्या नाना फडणवीसाला ते लक्षात येत नाही?
जोपर्यंत अशी अपरिपक्व व्यक्तिमत्वे समाजात असतील तो पर्यंत कोणतीही आदर्श व्यवस्था अस्तित्वातच येऊ शकणार नाही. माणूस जितका आधुनिक तितकाच आदिम कसा?
बॉस सारख्या लोकांना अपराधी भावना असते? का त्यांनी career  मध्ये कित्येक लोकांना असे बाजूला केलेले असते त्यामुळे त्याची सवय होते?  का त्यांची मूळ प्रवृत्तीच तशी असते? योग्यतेची व्याख्या काय? जे घडले ते चुकीचे कि दुर्दैवी? बरोबर काय आणि चूक काय हे कोण ठरवणार? आपण ते ठरवू शकतो का? जेव्हां आपली नियती दुसऱ्याकडे गहाण असते तेव्हाण असे स्वातंत्र्य असते का ?
असे प्रश्नांचे वादळ घेऊन यश घरी पोहोचला. या वादळामध्ये driving चे दोन तास कसे गेले हे कळलेच नव्हते
घराबाहेर थोडा वेळ तो गाडीत बसून राहिला. हे सगळे प्रश्न त्याला सतावत होते त्या प्रत्येकासाठी उत्तर शोधणे आवश्यक होते किंतु आता एकाच प्रश्नाचे उत्तर मिळवण्यावर लक्ष  केंद्रित करणे आवश्यक होते. आता पुढचा जॉब कसा शोधायचा . कारण  इतर प्रश्नांची उत्तरे परत कधी तरी शोधता येतील .

                                                                                                            अभिजीत कुंभार